निरंकारी मंडळाच्या सत्संगाचे कार्य आणि ईश्वरी ज्ञान घराघरात पोहोचवण्याचे सेवाकार्य प्रत्येकाने करावे, असे आवाहन हुक्केरी येथील संत निरंकारी सत्संग मंडळाचे ज्ञान प्रचारक आणि संयोजक मारुती मोरे यांनी केले. हुक्केरी येथे आयोजित माता सुनीता मोरे यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.


या कार्यक्रमाप्रसंगी कर्नाटक झोनल इंचार्ज सुनील कुमार रात्राजी यांनी उपस्थित राहून माताजींच्या कार्याचा गौरव केला. मनुष्याने आपल्या हयातीत इतरांना मदत करून आणि सत्संगात सहभागी होऊन आपले जीवन पावन करून घ्यावे. माता सुनीता देवी यांनी हुक्केरी येथे सत्संग भवन उभारण्यात आणि सत्संग कार्यक्रम यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले आहे, अशा शब्दांत सुनील कुमार रात्राजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ज्ञान प्रचारक मारुती मोरे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले की, संत निरंकारी मंडळाच्या बाबा आणि माताजींकडून मिळालेले ज्ञान आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले पाहिजे. जीवनात आपण केलेली पुण्यकर्मेच आपली खरी श्रीरक्ष ठरणार आहेत, असे मारुती मोरे यांनी म्हटले.
या कार्यक्रमात दिवंगत माता सुनीता मोरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित एका माहितीपटाचे (साक्षयचित्र) प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कारवारचे ज्ञान प्रचारक विनोद कलसकर, सौंदलगा मुखी बाळासाहेब कळंत्रे यांच्यासह हुक्केरी, चिक्कोडी, रायबाग आणि बेळगाव जिल्ह्यातील दड्डी, बावन सौदत्ती, मोरब, भावची अशा विविध गावांतील संत निरंकारी सत्संग मंडळाचे प्रमुख, ज्ञान प्रचारक आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments