Dharwad

धारवाड सीसीबी पोलिसांची मोठी कारवाई, तिघे गजाआड

Share

सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करणाऱ्या तिघांना धारवाड गोवनकोप्पा रस्त्यावरील मिलन हॉलजवळ अटक करण्यात धारवाड सीसीबी पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी धारवाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पीएसआय मंजुनाथ टी.एम. यांच्या नेतृत्वाखालील सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून अंदाजे १,९०,३०० रुपये किमतीचा १,९४० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

सीसीबी पोलिसांनी धारवाड निजामुद्दीन कॉलनी येथील महम्मदसमीर मुक्तीयारअहमद अत्तार (२१), जन्नत नगर येथील सय्यद बाबूसाब अत्तार (२६) आणि मणकिल्ला येथील झाकीरहुसेन इम्तियाज तडकळ (२४) या तिघांना अटक करून त्यांना धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

Tags: