Dharwad

धारवाड : घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकीमधील पेट्रोल चोरी

Share

अलिकडच्या काळात धारवाडमध्ये घरासमोर उभ्या केलेल्या बाईक्समधून पेट्रोल चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रात्री घरासमोर बाईक पार्क करून निश्चिंत झोपणाऱ्या मालकांना सकाळी वाहन सुरू करताना धक्का बसत आहे.

धारवाड येथील सैदापूर भागातील कलमेश्वर मंदिराच्या जवळील घरांसमोर उभ्या असलेल्या बाईक्सला चोरटे लक्ष्य करत आहेत. रात्री सर्वजण झोपल्यावर येऊन, चोरटे बाईक्समधील पेट्रोल चोरून पळ काढत आहेत. स्कूटीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी प्लास्टिकच्या बाटलीत बाईकमधील पेट्रोल चोरून पळ काढल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अशा प्रकारे पेट्रोल चोरीच्या घटना घडल्याने सैदापूर भागातील नागरिकांनी अनेकदा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र, हे पेट्रोल चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त बीट पोलीस नेमून पेट्रोल चोरणाऱ्या या चोरट्यांचा त्रास थांबवावा, अशी मागणी सैदापूर येथील रहिवासी आता पोलीस विभागाकडे करत आहेत.

Tags: