Belagavi

बेळगावात नूतनीकृत जिल्हा पोलीस समुदाय भवनाचे उद्घाटन

Share

बेळगाव मधील नूतनीकृत करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस समुदाय भवनाचे उद्घाटन आज पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. एम.ए. सलीम यांच्या हस्ते बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत पार पडले.

बेळगाव येथील सुभाषनगरमध्ये असलेले जिल्हा पोलीस समुदाय भवन नूतनीकृत करण्यात आले आहे. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. एम.ए. सलीम यांनी हे उद्घाटन केले.

यावेळी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, अतिरिक्त पोलीस निरीक्षक आर.बी. बसरगी, डीएआर पोलीस अधीक्षक अशोक झुंजरवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यानंतर पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. एम.ए. सलीम यांनी बैठक घेऊन उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Tags: