Dharwad

धारवाडच्या नवलगुंद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Share

बस स्थानकावर प्रवाशांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात धारवाडच्या नवलगुंद पोलिसांना यश आले आहे.

४ मार्च २०२५ रोजी गदग जिल्ह्यातील रोण तालुक्यातील एका महिलेचे नवलगुंद बस स्थानकावर सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. यासंदर्भात महिलेकडून तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली.

याबाबत बोलताना नवलगुंद पोलिस ठाण्याचे सीपीआय रविकुमार कप्पतनवर म्हणाले की, “आरोपींकडून ५ लाख २० हजार रुपये किमतीचे ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.” नवलगुंद पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे धारवाड जिल्ह्याचे एसपी तसेच डीवायएसपी यांनी कौतुक केले आहे.

आरोपींची चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या दोन्ही चोरांना कारागृहात पाठवण्यात आले आहे.

Tags: