Crime

ऑटोचालक असोसिएशन अध्यक्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी १२ जणांवर एफआयआर

Share

हुबळीतील ऑटो चालक असोसिएशनच्या अध्यक्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेऊन याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

खून करण्यात आलेल्या मृत आकाशचे वडील शेखरय्या मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुने हुबळी स्थानक येथे आकाशाची पत्नी, सासू आणि सासरे यांच्यासह एकूण 12 आरोपींविरुद्ध भादंवि १४९-३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत आकाशने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. यामुळे आकाशचे कुटुंबीय नाराज होते. मात्र आकाशच्या पत्नीच्या कुटुंबीयांकडे राहणाऱ्या आकाशचा पैशांसाठी पत्नीच्या कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप शेखरय्या मठपती यांनी केला असून याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या हत्येमागे दोन्ही कुटुंबातील मतभेदाचे कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी हा खून कोणी आणि का केला या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसा तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

Tags: