Belagavi

बसव कायकजीवी संघटनेतर्फे शालोपयोगी साहित्य वितरण

Share

बेळगाव तालुक्यातील चंदन होसूर गावात बसव कायकजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले आहे.

आजची मुले हेच उद्याचे भविष्य असून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हे साहित्य वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा सकारात्मक वापर करून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा राष्ट्रीय बसवदलाचे सचिव आनंद गुडस यांनी व्यक्त केली.

बसव कायकजीवी संघटना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर स्मशानभूमी स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि मोफत शववाहिन्या यांसारख्या विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात १३२ रक्तदात्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा देण्यात आला असून, ही सामाजिक सेवा अशीच अविरत सुरू राहील, अशी माहिती आनंद गुडस यांनी दिली.

या प्रसंगी इव्हेंट मॅनेजर बसवराज हंपन्नावर, श्याम गौडर, बसव कायकजीवी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत भांवी, राष्ट्रीय बसवदळ बेळगाव जिल्हाध्यक्ष अशोक बेंडिगेरी, पदाधिकारी संतोष गुडस, के. शरण प्रसाद, महांतेश गुडस, बसवराज गुडस, सिद्धार्थ गुडस, मल्लिकार्जुन आडीन, वीरेश उळवी, श्रीराज हावन्नवर, नितीन गुडस, शरणू लिंगायत, संकल्प गुडस, शिवराज एस, नंदकुमार के यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका आशा होत्तगीमठ, निवृत्त शिक्षिका श्रीदेवी नरगुंद, सदेप्प तान्सी, यल्लाप्पा पाटील, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: