विजापूर या ऐतिहासिक शहरात आज पहाटेच जेसीबीने गर्जना केली. महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ता मोकळा केला आहे.

विजापूर शहरातील अतिक्रमणे आज हटवून वल्लभभाई सर्कल ते विश्वेश्वरय्या सर्कल पर्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आला. या 100 फूट रुंद रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली होती. यासंदर्भात महापालिकेने अनेकदा नोटिसा बजावूनही अतिक्रमणे हटविण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार मेक्कळकी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रामनगरसह विविध भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.



Recent Comments