केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ कागवाड व अथणी तालुक्यात दलित समाजातर्फे निदर्शने करण्यात आली.

आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावरून केलेल्या विधानामुळे त्यांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत कागवाड आणि अथणी येथील दलित समाजाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात येत असल्याचे दलित महासंघाचे जिल्हा संचालक संजय तळवलकर यांनी सांगितले.

कागवाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. कागवाडमध्ये पक्षनिरपेक्ष दलित संघर्ष समिती आणि दलित नेत्यांनी एकत्र येऊन आमदार सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानाला सर्व दलित समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. सतीश जारकीहोळी यांची राजकीय प्रगती होऊ नये यासाठी विरोधी पक्ष जाणीवपूर्वक या गोष्टीला वाढवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला दलित नेते प्रकाश दोंडारे, बाळासाहेब कांबळे, सचिन पुजारी, विजय चौहान, जनार्धन दोंडारे, दीपक कांबळे, उदय कोडे, विशाल दोंडारे आदी उपस्थित होते.


Recent Comments