हुक्केरी तालुक्यात आणि शहरात आढळून येणाऱ्या नकली पत्रकारांवर आळा घालणे आवश्यक असल्याचे निवृत्त प्राचार्य पी. जी. कोण्णूर यांनी सांगितले.

हुक्केरी तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. हल्ली नकली पत्रकार आणि युट्यूब चॅनेल्सकडून होत असलेल्या छळमुळे अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून काम करणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे तालुक्यातील श्रमिक पत्रकारांनी यावर आळा घालण्यास पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले.

यानंतर जिल्हा प्रतिनिधी चेतन होळेप्पगोळ आणि राजू बागलकोटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत गौरवाध्यक्षपदी संजीव मुतालिक आणि पी. जी. कोण्णूर, तर अध्यक्षपदी रवींद्र कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी बाबू सुंकद, सचिन कांबळे, मल्लिकार्जुन गुंडकल्ले, सरचिटणीसपदी महादेव नाईक, बसवराज कोंडी, खजिनदारपदी सचिन खोत तर सदस्यपदी राजू कुरुंदवाडे, विश्वनाथ नाईक, सुरेश किल्लेदार, नंदकुमार हुक्केरी, शशांक माळी, आनंद बोम्मनवर आदी उपस्थित होते.


Recent Comments