मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेच पुढे मुख्यमंत्रीपदी कार्यरत राहतील, अशी प्रतिक्रिया आमदार रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.

२०३ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजप बहुमताने सरकार स्थापन करेल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दहा दिवसात गोड बातमी मिळेल. अथणी मतदार संघाचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी मंत्रिपद नको असल्याचे सांगितले असून मतदार संघातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आग्रह केला असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली.

आमदार श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद देण्यासंदर्भात दहा दिवसात निर्धार करण्यात येणार आहे. प्रियांका खर्गे यांच्यासंदर्भात बिट कॉईन प्रकरणी चौकशीसाठी सीआयडी विभागाने नोटीस जारी केली आहे. साक्षी आणि पुराव्यांविना काँग्रेस आरोप करून वेळ काढत असल्याचे जारकीहोळी म्हणाले. ()
पीएसआय परीक्षा घोटाळाप्रकरणी होत असलेल्या आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, राजकारणी आणि बड्या अधिकाऱ्यांच्या समावेश असल्याचे पुरावे सादर करावेत, आरोप सिद्ध झाल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल.
अथणी येथे सभा घेण्यासंदर्भात ते म्हणाले, अथणी आणि गोकाकमध्ये भव्य मेळावा घेण्यासाठी अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय नेते येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अथणी आणि कागवाड मधील नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. कोणतीही गुप्त सभा होणार नसून कार्यकर्ते आणि नेत्यांची सभा घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण रमेश जारकीहोळी यांनी दिले.


Recent Comments