हुक्केरी हिरेमठ हा सार्वभौमत्व जपणारा मठ आहे. अनेक जाती धर्माचे भक्त या मठात येतात, यामुळे मानव धर्म हाच श्रेष्ठ धर्म असल्याचा संदेश हुक्केरी हिरेमठाच्या माध्यमातून दिला जातो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नट दोड्डण्णा यांनी व्यक्त केली.

लक्ष्मी टेकडियेथील हुक्केरी हिरेमठाच्या शाखा मठात आलेल्या दोड्डण्णा यांचा सत्कार करण्यात आला. श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी आणि कन्नड संघटनेच्या क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांच्याहस्ते दोड्डण्णा यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना दोड्डण्णा म्हणाले, इतर मठांपेक्षा हुक्केरी हिरेमठ हा वेगळा आहे. या मठात मानव धर्माचा जयजयकार केला जातो. याठिकाणी आल्यावर मला समाधान मिळते. गुरूंचे आशीर्वाद घेऊन आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते, धैर्य मिळते असे ते म्हणाले. 
यावेळी अशोक चंदरगी बोलताना म्हणाले, दोड्डण्णा यांनी वरचेवर बेळगावमध्ये येऊन आमचा पाहुणचार स्वीकारावा अशी खूप दिवसांपासून आमची इच्छा होती. आज ते हुक्केरी हिरेमठ आले याचा आपल्याला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
याचप्रमाणे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, दोड्डण्णा हे केवळ पडद्यावरील नट नसून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात देखील सहभाग घेतला आहे. याचपद्धतीने अध्यात्मात देखील त्यांना रस असल्याचे स्वामीजी म्हणाले.
यावेळी बेळगाव युवा काँग्रेस उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर बोलताना म्हणाले, हुक्केरी हिरेमठ हा प्रत्येकाला सामावून घेणारा मठ आहे.
अल्पसंख्यांक मंडळाचे अध्यक्ष मुक्तार हुसेन पठाण यांनी अभिनेते दोड्डण्णा यांनी हिरेमठास दिलेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी नारायण कलाल यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक वीरुपाक्षय्य निरलगीमठ यांनी केले तर शंकर बागेवाडी यांनी आभार मानले.


Recent Comments