नंदगड येथील ग्राम पंचायत सदस्य वैष्णवी पाटील यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत साजरा केला.

सामान्यतः प्रत्येक व्यक्ती आपला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचा संकल्प ठेवते. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना जनसामान्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने नंदगड ग्राम पंचायत सदस्या वैष्णवी पाटील यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत साजरा केलाय. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे.


खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड ग्राम पंचायतीच्या सदस्या वैष्णवी पाटील यांनी शाहू नगर येथील मल्लिकार्जुन वृद्धाश्रमाला भेट देऊन आपला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प ठेवून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या. वैष्णवी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रमात केक कापण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठांना ब्लॅंकेट्सचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
एका लोकप्रतिनिधीने जनसामान्यांसोबत केलेल्या वाढदिनाच्या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.


Recent Comments