हुक्केरी तालुक्यातील ग्रामपंचायतींची त्रैमासिक बैठक अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

हुक्केरी तालुका पंचायत सभा भवनात आयोजित करण्यात आलेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत घरपट्टी आणि व्यावसायिक कर थकबाकीबद्दल उमेश कत्ती यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विविध ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांनी प्रगती आढावा तसेच कर वसुलीसंदर्भात माहिती दिली. 

गावच्या विकासासाठी जनतेकडून कर आकारणी करणे आवश्यक आहे. आपल्या घराची, दुकानांची कर थकबाकी वेळेत भरण्यात यावी, तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी कर न भरलेल्या घरांना देण्यात सरकारी सुविधा कपात कराव्यात. अशा सूचना देण्यात आल्या. तसेच करवसुली योग्यपद्धतीने करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तालुका प्रशासनाने सत्कार करावा, अशा सूचना उमेश कत्ती यांनी दिल्या.
यावेळी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही, ग्रेड २ तहसीलदार किरण बेळवी, इओ उमेश सिदनाळ, आदी उपस्थित होते. के डी पी बैठकीत विविध विभागाचे अधिकारी, ग्राम पंचायत विकास अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments