Vijayapura

सिंदगीत युवकाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू

Share

पार्टीत मद्यप्राशन केल्यानंतर युवकाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील शिवानी हॉटेलजवळ घडली.

सिंदगीतील रहिवाशी निरंजन अल्लीमठ याने मित्रांसमवेत शनिवारी रात्री पार्टी केली होती. त्यावेळी त्याने अति मद्यप्राशन केले होते. त्यानंतर अत्यवस्थ झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्याच्या मित्राने पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

 

 

Tags: