निपाणी येथील ईदगाह मैदान परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाचे कुलूप फोडून चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य लांबवले असून चोरीची ही सर्व दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

येथील रहिवासी महावीर पत्रावळे यांचे ‘पूजा इलेक्ट्रिकल मोटार सेल्स अँड सर्व्हिस’ नावाचे दुकान असून, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातून नवीन व जुन्या तांब्याच्या तारा, दुरुस्तीसाठी आलेल्या मोटर्स आणि इतर सुटे भाग असे एकूण सात लाख रुपयांचे साहित्य लंपास केले असून महावीर पत्रावळे सकाळी दुकानावर आले असता हा प्रकार उघडकीस आला.

चोरीची संपूर्ण घटना दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत.
याप्रकरणी महावीर पत्रावळे यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.



Recent Comments