Banglore

श्रील प्रभुपाद यांच्यावरील नाण्याचे अनावरण

Share

आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाचे अर्थात इस्कॉनचे संस्थापक आचार्य भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद स्वामी यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी विशेष नाण्याचे अनावरण केले

होय, श्रीकृष्णराधनेच्या भक्तिरसामृताची संपूर्ण जगाला भुरळ पाडणाऱ्या इस्कॉनचे संस्थापक आचार्य भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद स्वामी यांची यंदा १२५वी जयंती आहे. त्यानिमित्त भारतात आणि जगात इस्कॉनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरात मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते आज श्रील प्रभुपाद स्वामी यांची मुद्रा असलेल्या १२५ रु दर्शनी मूल्य असलेल्या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी इस्कॉनचे दक्षिण शाखाध्यक्ष श्री वरदकृष्णदास, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा आदी उपस्थित होते.

Tags: