Banglore

१०८ ऍम्ब्युलन्स सेवेचे १२० ऍम्ब्युलन्स असे नवे नामकरण

Share

 माणसाच्या आरोग्य रक्षणात ऍम्बुलन्सचे स्थान महत्वाचे आहे. या सेवेचा विस्तार गावोगावी झाला पाहिजे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळुरात विधानसौधच्या आवारात रविवारी १०८ ऍम्ब्युलन्स सेवेचे १२० ऍम्ब्युलन्स असे नवे नामकरण करून हिरवा झेंडा दाखवून चालना दिल्यानंतर ते बोलत होते. 

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, रुग्णवाहिका केवळ रुग्णवाहिका न राहता इमर्जन्सीच्या वेळी तातडीची वैधकीय सेवा देणारे फिरते इस्पितळ झाली पाहिजे. बोलावताक्षणी ती आली पाहिजे. या सेवेचे नाव १०८ का ठेवले माहित नाही. कदाचित आरोग्याच्या १०८ समस्यांवर ती तोडगा आहे म्हणून हे नाव दिले असावे, आरोग्याची समस्या उदभवल्यास १०८ला बोलवा असे खेड्यात म्हटले जाते. या सेवेचा दुर्गम भागातही विस्तार झाला पाहिजे. आमचे आरोग्यमंत्री स्वतः डॉक्टर असल्याने आरोग्य क्षेत्राला काय हवे ते सगळे करताहेत. ते हुशार आहेत. पण हुशार असणे ही आमच्यासाठी समस्याच आहे असा चिंता मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री सुधाकर याना काढला.

यावेळी आरोग्यमंत्री सुधाकर, परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, फलोद्यान मंत्री मुनिरत्न आदी उपस्थित होते.

 

 

Tags: