Belagavi

“पंच हमी” पुस्तिकेचे प्रकाशन

Share

राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कर्नाटक सरकारने राबवत असलेल्या “पंच हमी” योजनांबाबत माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज गोकाक येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडले. ही पुस्तिका माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.

या वेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, सरकारच्या पंच हमी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे. महिला, कामगार तसेच सामान्य जनतेच्या जीवनमान सुधारण्यात या योजना उपयुक्त ठरत आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत या योजना पोहोचल्या आहेत.

या कार्यक्रमाला माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, जिल्हा पंचायतचे उप सचिव बसवराज हेग्गनायक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: