Belagavi

धारवाड–कित्तूर–देसूर–बेळगाव थेट रेल्वे सेवा लवकरच

Share

बेळगावकरांची बहुप्रतीक्षित धारवाड–कित्तूर–देसूर–बेळगाव थेट रेल्वे सेवा लवकरच सुरु होणार असून, १२०० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बेळगाववासीयांची बहुप्रतीक्षित धारवाड–कित्तूर–देसूर–बेळगाव थेट रेल्वे सेवा लवकरच सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली १२०० एकर जमीन केवळ ५ महिन्यांत अधिग्रहित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

हे प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने राबवले जात असून, या मार्गामुळे आता प्रवाशांना लोंढा मार्गाला वळसा घालण्याची आवश्यकता राहणार नाही.

बेळगाव–धारवाड दरम्यान थेट सुपरफास्ट रेल्वे सेवा लवकर सुरु होईल. एक महिन्याच्या आत रेल्वे मंडळाकडून यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Tags: