Belagavi

हक्कपत्र वितरण शासनाची महत्त्वाकांक्षी योजना : जिल्हाधिकारी

Share

हक्कपत्र वितरण ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, पुढील महिन्यात होस्पेट येथे मुख्यमंत्री स्वतः हक्कपत्रांचे वितरण करणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हक्कपत्र वितरण ही योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, जिथे जिथे महसूल गावे व उपगावे स्थापन करण्यात आले आहेत, तेथील रहिवाशांना हक्कपत्र देण्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश आहेत. यासाठी ३,७०० हक्कपत्रे तयार करण्यात आली असून, त्यासोबत खरेदीपत्र आणि पहाणीपत्र देण्याची तयारीही पूर्ण झाली आहे.

पुढील महिन्यात म्हणजे १५ ते २० तारखेच्या दरम्यान विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते समारंभपूर्वक हक्कपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही हक्कपत्रे दिली जातील.

त्याचबरोबर महसूल ग्रामांतील १,७०० प्रलंबित हक्कपत्रांचे वाटपदेखील एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Tags: