खवटकोप्प गावाजवळ रस्त्यावर हरवलेली बॅग प्रदीप नांदगाव नामक व्यक्तीला सापडली असून या व्यक्तीने प्रामाणिकपणे सदर दागिन्यांची बॅग अथणी पोलिसांकडे सुपूर्द करत माणुसकीचे दर्शन घडविले.

विजयपूर जिल्ह्यातील रेवणसिद्ध विठ्ठल हूगार (होरटी) हे सौंदत्तीला जात असताना खवटकोप्प मार्गावर त्यांची एक बॅग हरवली होती. ही बॅग खवटकोप्प गावातील प्रदीप बाबू नंदगाव यांना सापडली. बॅग तपासल्यावर त्यात सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले.
प्रदीप नंदगाव यांनी ती बॅग अथणी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी बॅगेतील दागिन्यांचा तपास करून खरे मालक शोधून, ते दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले. प्रदीप नंदगाव यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे, तसेच अथणी पोलिसांनी वेळेवर योग्य कारवाई केल्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.


Recent Comments