Belagavi

बेळगावात बसवजयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना पंचधातूच्या घुंगरांची भेट

Share

बेळगावात बसवजयंतीनिमित्त बेळवडीगावात पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोन्याचे व्यापारी सुनील वेर्णेकर यांनी शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना पंचधातूंच्या घुंगरांची भेट दिली.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातल्या बेळवडी गावात जगज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त आणि स्थानिक जत्रा महोत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना पारंपरिक अलंकारांनी सजवून या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

या मिरवणुकीनिमित्त सोन्याचे व्यापारी सुनील वेर्णेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत १५० पेक्षा अधिक बैलजोड्यांसाठी पंचधातूपासून बनवलेलय घुंगरांची भेट दिली. तसेच शेतकऱ्यांचा सन्मानही केला.

या प्रसंगी अर्जुन केंपण्णवर, शिवानंद भोजय्यनवर, संगप्पा बागेवाडी, प्रवीण बागेवाडी, वीरश गुड्डदमठ, मंजनाथ खन्नप्पनवर, बाबण्णा खंडोजी, अनिल करिकट्टी आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: