Belagavi

हिरेबागेवाडी उरूस पार्श्वभूमीवर भव्य कुस्ती स्पर्धा

Share

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील दरगाह शरीफ हजरत पीर महमदगौस शाह खाद्री संदल उरूस पार्श्वभूमीवर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे दरगाह शरीफ हजरत पीर महमदगौस शाह खाद्री संदल उरूस आणि कुस्ती स्पर्धा पार पडल्या.

शेवटच्या दिवशी झालेल्या कुस्ती सामन्यांमध्ये नंबर वन कुस्तीत महाराष्ट्र केसरी बारामतीचे भरत मदनी आणि भारत केसरी पंजाबचे संदीप मान यांच्यात थरारक झुंज रंगली. अखेरीस महाराष्ट्र केसरी भरत मदनी यांनी विजय मिळवला.

या कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी जमली होती. शेवटच्या दिवशी झालेल्या कुस्त्यांना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बडेकोळ मठाचे नागेंद्र स्वामीजी, दरगाहचे प्रमुख आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Tags: