Belagavi

बेळगावात डॉ. राजकुमार आणि पी. बी. श्रीनिवास यांच्या स्मरणार्थ गीतगायन कार्यक्रम

Share

 

बेळगावातील बेल्ली चुक्की सांस्कृतिक अकॅडमी आणि कन्नड भवन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राजकुमार आणि पी. बी. श्रीनिवास यांच्या स्मरणार्थ भावगीतांचा ‘गीतगायन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता.

कन्नड भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक य. रु. पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मुरुगेश बाबू यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. राजकुमार यांची नातं सरस्वती कोसगी आणि पणतू वरदान कोसगी यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सरस्वती कोसगी यांनी आपल्या आजोबांसमवेतच्या स्मृतींना उजाळा दिला.

डॉ. मुरुगेश बाबू यांनी डॉ. राजकुमार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांना आदरांजली वाहिली.

य. रु. पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ. राजकुमार यांचं बेळगाव जिल्ह्याशी असलेलं भावनिक नातं आणि रंगभूमीशी असलेली त्यांची घट्ट नाळ यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या शेवटी, दोघांच्या अजरामर गाण्यांचा गीतगायन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी बेल्ली चुक्की अकॅडमीच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

Tags: