पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी सायंकाळी आयोजिण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी उद्यानापासून सुरु झालेल्या मशाल मिरवणुकीत बहुसंख्येने अबालवृद्धांसहित नागरिकांचा सहभाग होता. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कृष्णा भट यांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत दहशतवादाविरोधात हिंदूंनी रस्त्यावर उतरवण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी उद्यानापासून सुरू सदर मिरवणूक सुरु झाली त्यानंतर शहापूर, खडेबाजार, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रोड, गुड्स शेड रोड मार्गे आरएसएस मैदानावर मिरवणुकीची सांगता झाली.


Recent Comments