Belagavi

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयामध्ये फूड फेस्टचे आयोजन

Share

कला,वाणिज्य,विज्ञान व गृह विज्ञान महाविद्यालय, एम.कॉम आणि एम.एससी (रसायनशास्त्र) स्नातकोत्तर केंद्र बेळगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रंगीबेरंगी फूड फेस्टिव्हलचे आयोजन शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले होते. या फेस्टिव्हलमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध देशातील आणि स्थानिक पदार्थांचे स्टॉल लावून उपस्थिताना स्वादिष्ट जेवणाचा अनुभव दिला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यामध्ये पारंपरिक पदार्थ तसेच पाश्चात्त्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी स्टॉल सजावट केली होती आणि खाद्यपदार्थांच्या पार्श्वभूमीची माहितीही त्यावेळी त्यांनी दिली. त्यामध्ये मठ्ठा, सोलकढी, घावण, दिवशी, आळूवडी, झुणकाभाकर, दहीभात, मिसळ, कांदापोहे, दहिपोहे, जिगळी, कैरी, पाणीपुरी, भेळ, पावभाजी, बीटपोहे, बीटकोशिंबीर,सँडविच, वडापाव, केक, बिस्किटचाट, काजूमिठाई, समोसा, कचोरी, अलिपाक इत्यादी पदार्थ बनवले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.जे. मोळेराखी म्हणाले की, अशा प्रकारच्या फूड फेस्टिवलमुळे विद्यार्थ्यांना विविध संस्कृतींचा परिचय होतो तसेच स्वयंपाक कला आणि व्यवस्थापन कौशल्य विकसित होतात. हा उपक्रम महाविद्यालयीन जीवनात उत्साह आणि नवीन अनुभव घेऊन येतो. इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या सर्व पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी कॅशलेस व्यवहाराचा वापर करून नव्या अर्थव्यवस्थेचा प्रचार केला आणि स्वच्छतेसाठी कचराकुंड्या ठेवून स्वच्छ भारत अभियानात योगदान दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकत्रितपणा वाढला आणि त्यांनी आनंदाने हा कार्यक्रम साजरा केला.

Tags: