विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थेच्या बेळगाव विभागातर्फे शिशु शिक्षण व विद्याविकासासाठी दहा दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था, विद्याभारती कर्नाटक बेळगाव जिल्ह्याच्या वतीने शिशु शिक्षण आणि विद्याविकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे दहा दिवसांचे शिबिर २४ एप्रिलपासून ४ मेपर्यंत अनगोळ येथील संत मीरा शाळेत पार पडत आहे.
या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक तसेच जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंदराव देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्याभारती प्रांताध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी भूषवले. विशेष अतिथी म्हणून विभागीय शिक्षण समन्वय अधिकारी डी. हिरेमठ हे उपस्थित होते.
या शिबिरात कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे २३५ शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला आहे. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून मुलांच्या सर्वांगीण विकासात संस्कार, सेवाभाव आणि क्षात्रतेज यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी आपल्या कार्याबद्दल प्रेम ठेवले पाहिजे, तेव्हाच ते देशासाठी जबाबदार नागरिक घडवू शकतील, असे मार्गदर्शन त्यांनी दिले.


Recent Comments