बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर येथील शिवजयंती उत्सव मंडळांची बैठक आज पार पडली.

या बैठकीत डॉल्बीचा वापर टाळण्यासहीत शिवकालीन देखाव्यांवर भर देण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली. तसेच डॉल्बीच्या वापरामुळे इतर मंडळांच्या कार्यक्रमांवर होणाऱ्या अडथळ्यांना टाळण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले गेले.


दरवर्षी मिरवणुकीला होत असलेला विलंब लक्षात घेत यंदाची मिरवणूक वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासंदर्भात चर्चा करून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत रणजित हावळण्णाचे, अशोक चिंडक, श्रीमंत शंकर प्रभु, हीरालाल चव्हाण, प्रकाश हेब्बाजी, शिवाजीराव हावळण्णाचे, रोहित भातकांडे, अभिजीत मजूकर, रविंद्र शिगेहळिकर, सूरज लाड यांसह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.


Recent Comments