Belagavi

कर्नाटक पोलीस ज्यूडो क्लस्टर मीटमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची कामगिरी

Share

कर्नाटक पोलीस ज्यूडो क्लस्टर मीटमध्ये बेळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

बेळगावच्या नेहरू नगरमधील डाएस ज्यूडो इनडोअर सभागृहात कर्नाटक पोलीस ज्यूडो क्लस्टर मीट पार पडली. या स्पर्धेत पोलीस कॉन्स्टेबल धरेप्पा एम.टी. यांनी 66 किलो गटात प्रथम क्रमांक, पोलीस कॉन्स्टेबल लिंगेश्वर एस. यांनी 81 किलो गटात प्रथम क्रमांक, पोलीस कॉन्स्टेबल लिखित एस. यांनी 90 किलो गटात प्रथम क्रमांक तसेच पी.एस.आय. अविनाश नायक यांनी 100 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला. महिला विभागात पोलीस कॉन्स्टेबल पार्वती अंबळी यांनी 70 किलो गटात आणि पी.एस.आय. त्रिवेणी कलकुटगी यांनी 78 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवला.

या विजयानंतर सर्व स्पर्धकांची येत्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस क्रीडास्पर्धेतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी ज्यूडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि भैरवी मुझुमदार यांनी प्रशिक्षण दिले. तसेच 2 बटालियन केएसआरपीचे एसपी/कमांडंट रमेश बोरगवी, केएसआरपी निरीक्षक जी.जी. सिद्धारेड्डी आणि ज्योती परांडे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन करून ज्यूडो क्लस्टर स्पर्धेचे आयोजन केले.

Tags: