Belagavi

बेळगाव: २१ केंद्रांवर सीईटी परीक्षा सुरळीत पार

Share

 

बेळगाव शहरातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा बुधवारी विविध केंद्रांवर सुरळीत पार पडली.

सीईटी परीक्षेसाठी आज सकाळपासूनच शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती. बेळगाव शहरात एकूण २१ परीक्षा केंद्रे होती. बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात झालेल्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेला एकूण ७,४३६ विद्यार्थी बसले होते आणि बुधवारी दुपारी दुसऱ्या सत्रात झालेल्या रसायनशास्त्राच्या परीक्षेला एकूण ७,४३० विद्यार्थी बसले होते. पारदर्शक आणि शिस्तबद्ध परीक्षा होण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पोलिस विभागाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागासह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले.

Tags: