आज सकाळी बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा चौकात श्रीरामसेना आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी गोमांसाच्या तस्करीसाठी वापरले जात असलेल्या बोलेरो वाहनाला पकडले.
या वाहनात गोमांस असल्याचा संशय आल्याने कार्यकर्त्यांनी वाहन थांबवून तपास केला आणि त्यात गोमांस आढळल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. चालकाला पोलिसांच्या ताब्यात देत, श्रीरामसेना आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी तात्काळ एपीएमसी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वाहन आणि चालकाला ताब्यात घेत, तपास सुरू केला आहे. वाहन चालकाने सांगितले की, कॅम्प परिसरात गोमांस दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याचे काम चालले होते.

यावेळी श्रीरामसेना जिल्हाध्यक्ष रवी कुमार कोकितकर यांनी सरकारला गोहत्येवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले.


Recent Comments