Belagavi

कागलमध्ये बेळगावच्या देवदादा सासणकाठीचे जल्लोषात स्वागत

Share

बेळगाव येथील श्री देवदादा सासणकाठीने आज पहाटे महाराष्ट्रातील कागल गावात पदार्पण करताच तेथील लोकांनी सासनकाठीचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले. यावेळी काठीची आरती-पूजा करून पुष्पवृष्टी करण्यात आली.

श्री देवदादा सासणकाठी सध्या पदयात्रेवर असून, कोल्हापूरच्या श्री ज्योतिबा मंदिराकडे मार्गस्थ आहे. या यात्रेअंतर्गत आज सकाळी सासणकाठी कागल गावात दाखल झाली. श्रीकृष्ण मंदिरात काठीचा मुक्काम आहे. तिथे दुपारपर्यंत पूजेचे कार्यक्रम झाला. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

दुपारी पूजेनंतर सासणकाठी पुढील प्रवासासाठी गोकुळ शिरगावकडे रवाना झाली. कागलवासीयांनी मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने या पवित्र सासणकाठीचं स्वागत केले. यावेळी संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले.

संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थ, भाविक आणि स्थानिक मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

Tags: