Belagavi

केएलई एज्युकेशन एक्स्पो 2025 ला चांगला प्रतिसाद

Share

बेळगावच्या के.एल.ई. संस्थेच्या वतीने आयोजित ‘एज्युकेशन एक्स्पो-2025’ ला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वैद्यकीय, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव येथील नेहरू नगरमधील जेएनएमसी कॅम्पसमधील के.एल.ई. शताब्दी सभागृहात ‘एज्युकेशन एक्स्पो-2025’ चे उद्घाटन के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी काहेरचे उपकुलगुरू डॉ. नितीन गंगाणे, रजिस्ट्रार एम.एस. गणाचारी, अलाईड हेल्थ सायन्सच्या प्राचार्या डॉ. ऊर्मिला कागल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

के.एल.ई. उन्नत शिक्षण व संशोधन अकादमी डिम्ड विद्यापीठात अलाईड हेल्थ सायन्सच्या विविध पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या अभ्यासक्रमांतून विद्यार्थी प्रतिष्ठित संस्थांमध्ये नोकरीला लागले आहेत. या अभ्यासक्रमांचे महत्त्व आणि रोजगाराच्या संधी याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग सायन्स आणि अलाईड हेल्थ सायन्स यांसारख्या अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. त्यांनी या अभ्यासक्रमांचे प्रवेश निकष, कालावधी आणि करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

अलाईड हेल्थ सायन्सच्या प्राचार्या डॉ. ऊर्मिला कागल यांनी पीयूसी उत्तीर्ण तसेच द्वितीय पीयूसीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक्स्पो अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले. त्यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग सायन्स आणि अलाईड हेल्थ सायन्स अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी आणि काहेरचे सदस्य सहभागी झाले होते

Tags: