बेळगावमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग फेस्ट मोठ्या उत्साहात पार पडला. या फेस्टमध्ये देश-विदेशातील योगपटूंनी सहभाग घेतला आणि अय्यंगार योगशास्त्राच्या विविध तंत्रांचा प्रत्यक्ष सराव केला.


आज बेळगावच्या श्रीकांत योगा सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. योगगुरू डॉ. अभय केंस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली योगपटूंना अय्यंगार योगाच्या विविध तंत्रांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.


या वेळी योगगुरू डॉ. अभय केंस्ते यांनी योगाच्या प्राचीन परंपरेबाबत माहिती देत प्रत्येकाने नियमित योगसाधना करून निरोगी जीवन जगावे, असे सांगितले. अय्यंगार योगाच्या ३० विविध प्रकारांमध्ये शरीर व मन संतुलित करण्याची ताकद आहे.

जगभरात या पद्धतीला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. याची थेरेपी आणि प्रशिक्षण अनेक देशांत दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

या योग फेस्टमध्ये बंगळुरू, बळ्ळारी, जयपूर, हृषिकेश, अयोध्या आणि परदेशातील न्यूयॉर्क, दुबई येथील योगपटूंनी सहभाग घेतला. अय्यंगार योग पद्धतीमुळे मन व शरीर मजबूत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी योगपटूंनी समाजातील प्रत्येकाने योग हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा आणि आरोग्यदायी समाज निर्माण करावा, असा संदेश दिला.


Recent Comments