Belagavi

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेंतर्गत दिव्यांग महिलेस मदत!

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड येथील झुंझवाड कार्यक्षेत्रातील दिव्यांग पार्वती गंगप्पा गुरन्नावर यांना श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेअंतर्गत ‘यू शेप व्हील केअर’ प्रदान करण्यात आले.

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध मदतीच्या योजना राबवल्या जातात. याच उपक्रमांतर्गत नंदगड येथील झुंझवाड कार्यक्षेत्रातील पार्वती गंगप्पा गुरन्नावर यांना ‘यू शेप व्हील केअर’ प्रदान करण्यात आले. नंदगड विभागाचे निरीक्षक महांतश डोळीकोप्प यांनी सेवा प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार्वती गुरन्नावर यांना या उपकरणाचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेचे सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: