Belagavi

बेळगावात रिक्षा अपघातात चालकाचा मृत्यू

Share

भरधाव वेगाने जात असलेली रिक्षा थेट दुभाजकाला आदळून चालकाचा जागीच अंत झाला! ही धक्कादायक घटना बेळगावजवळील हलगा गावाजवळ घडली आहे.

काल मध्यरात्री न्यू गांधी नगर भागातील ४५ वर्षीय महम्मदअली शब्बीरअहमद भारगीर हे धामणे गावातील सासरहून रात्रीचे जेवण करून घरी परतत होते. मात्र, हलगा पब्लिक स्कूलजवळ भरधाव वेगामुळे त्यांचे रिक्षावर नियंत्रण सुटले आणि ती थेट दुभाजकाला धडकली.

या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश यरगोप्पा यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

Tags: