Belagavi

पेट्रोल-डिझेलच्या काळया बाजाराला थारा नाही : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

Share

बेळगाव जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल माफियांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत काळ्या बाजाराला थारा दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘तैल पदार्थ नियंत्रण कायदा’ आणि ‘आवश्यक वस्तू कायदा – 1955’ अंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे. अवैधपणे तेल चोरी करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील. यासोबतच लवकरच तेल उत्पादक आणि घाऊक विक्रेत्यांची बैठक आयोजित केली जाईल.

सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि महागड्या दराने तेल विक्री होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. कोणत्याही परिस्थितीत काळ्या बाजाराला थारा दिला जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले.

Tags: