बागलकोट जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी सतत कमी होत आहे, आणि त्यामुळे मोठ्या मगरी आता नदी सोडून बाहेर पडू लागल्या आहेत. परिणामी, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सदर प्रकार बागलकोट जिल्ह्यातील गळगळीजवळील रबकवी गावात निदर्शनात आला असून सुरेश गुम्मडी यांच्या शेतात मोठी मगर दिसून आली, ज्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. नदीतील पाणी आटत असल्याने मगरी अन्नाच्या शोधात बाहेर येत आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ग्रामस्थांनी तात्काळ अरण्य विभागाला माहिती दिली, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मगर सुरक्षितपणे पकडली. या सर्व घडामोडी स्थानिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाल्या असून सदर घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
ग्रामस्थांच्या मदतीने ही मगर पुन्हा कृष्णा नदीत सोडण्यात आली. मात्र, मगरींच्या सतत वाढत्या हालचालीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकिनारी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


Recent Comments