Belagavi

केएलई संस्थेच्या वतीने ‘एज्युकेशन एक्स्पो-2025’

Share

बेळगावमध्ये केएलई संस्थेच्या वतीने ‘एज्युकेशन एक्स्पो-2025’चे आयोजन करण्यात आले आहे. 4 आणि 5 एप्रिल रोजी नेहरू नगर येथील जेएनएमसी कॅम्पसमधील शताब्दी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यात विद्यार्थी आणि पालकांना वैद्यकीय, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

केएलई उच्च शिक्षण आणि संशोधन अकादमी (KAHER) डिम्ड युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत विविध वैद्यकीय आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अलाइड हेल्थ सायन्सेस, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग यासारख्या अभ्यासक्रमांचे संपूर्ण मार्गदर्शन या एक्स्पोमध्ये दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.

या एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष, अभ्यासक्रमाचा कालावधी आणि भविष्यातील करिअर संधी याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी केएलई डिम्ड युनिव्हर्सिटीने यावर्षीही ‘ऑल इंडिया एंट्रन्स टेस्ट-2024’ (AIET-2024) आयोजित केली आहे. देशातील कोणत्याही ठिकाणाहून विद्यार्थ्यांना ही परीक्षा ऑनलाइन देता येईल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केवळ 10 Mbps इंटरनेट असले की मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबलेटद्वारे परीक्षा देता येईल.

ही परीक्षा पूर्णतः कागदरहित (Paperless) असून AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रॉक्टरिंग प्रणालीद्वारे परीक्षा दिली जाणार आहे. नकलाप्रसंग टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थीवर ‘प्रॉक्टर’ची देखरेख असेल. परीक्षेचा कालावधी 100 मिनिटांचा असून, यामध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिलपर्यंत असून केएलई युनिव्हर्सिटीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.kledeemeduniversity.edu.इन ऑनलाइन अर्ज भरावा. परीक्षा 11 मे रोजी झूम लिंकद्वारे घेतली जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केएलई युनिव्हर्सिटीच्या अलाइड हेल्थ सायन्सेस अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळेल. यामध्ये फार्मसी, नर्सिंग, बीएस्सी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, रेडिओग्राफी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर आणि अॅनस्थेशिया टेक्नॉलॉजी, कार्डिअॅक केअर टेक्नॉलॉजी, न्यूरो सायन्स टेक्नॉलॉजी, रेस्पिरेटरी केअर टेक्नॉलॉजी, न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, एंडोस्कोपी टेक्नॉलॉजी, रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजी यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

पूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये मर्यादित असलेलेअलाइड हेल्थ सायन्सेस अभ्यासक्रम आता ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही सहज उपलब्ध होत आहेत. मागील वर्षी प्रथमच परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना फायदा झाला होता. यावर्षीही परीक्षा ऑनलाइनच घेतली जाणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केएलई संस्थेचे चान्सलर डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले आहे.

Tags: