Belagavi

साईश्वरीने जुडो स्पर्धेमध्ये कास्यपदक पटकाविले…

Share

मराठा मंडळ महाविद्यालयातील कला शाखेची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साईश्वरी कोडूचवाडकर हिने देहराडून येथे 28 मार्च ते 31 मार्च यादरम्यान झालेल्या ज्युनियर नॅशनल ज्युडो चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेमध्ये कास्यपदक पटकाविले आहे.

या यशाकरिता तिचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष डॉ. राजश्री हलगेकर, प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी आणि क्रीडा प्रशिक्षक प्रा. राजू हट्टी यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्वांनी तिचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Tags: