Belagavi

वि. प. सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते विकासकामांना चालना

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडाल अंलकगी गावात सीसी रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

बडाल अंलकगी गावातील रस्ते सुधारण्यासाठी आमदार निधीतून अनुदान देण्यात आले असून, या कामांसाठी उच्च दर्जाच्या गुणवत्तेची हमी द्यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Tags: