Belagavi

बेळगावमध्ये वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

Share

बेळगावमध्ये रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. अंजुमन संस्थेसमोर युवकांनी पोस्टर झळकावत वक्फ कायदा त्वरित रद्द करावा आणि एसडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष मोयदीन के. फैजी यांना मुक्त करावे, अशी मागणी केली.

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर अंजुमन संस्थेच्या बाहेर मुस्लिम समाजाने वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने केली. निदर्शकांनी हातात पोस्टर घेत ख्रिश्चनमंडळात ख्रिस्ती, मुझराईमध्ये हिंदू असताना, मग वक्फमध्ये केवळ मुस्लिम समाजाला का वेगळे? असा सवाल उपस्थित केला.

वक्फ कायदा सुधारणा रद्द झालीच पाहिजे. आमच्या धार्मिक हक्कांवर गदा आणली जात आहे. तसेच, एसडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के. फैजी यांची त्वरित सुटका झाली पाहिजे,अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या मुस्लिम तरुणांनी केली.

या निदर्शनांसोबत कित्तूरमध्येही मुस्लिम समाजाने हाताला काळी पट्टी बांधून मूकमोर्चा काढला आणि वक्फ कायदा त्वरित रद्द करण्यासह एसडीपीआय अध्यक्ष मोयदीन के. फैजी यांची सुटका करण्याची मागणी केली.

Tags: