Belagavi

शहापूर पोलीस ठाण्यासमोर बजरंग दलाचा ठिय्या

Share

हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस लक्ष्य करीत असल्याचा आरोप करीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री शहापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडले.

शहापूर पोलिस ठाणा हद्दीतील श्रीराम कोटे आणि मनोज हलगेकर यांना गुंडा कायद्याअंतर्गत तडीपार करण्यात येत आहे. ही तडीपारीची कारवाई थांबवावी अशी मागणी करीत, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले.

बेळगावातील अश्वत्थामा मंदिरावर झालेल्या दगडफेकीबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविण्यात येत आहे, असा आरोप करीत ही कारवाई थांबवावी, अशी मागणी करीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहापूरपोलीस ठाण्यासमोर धरणे धरली आणि तडीपारीच्या कारवाईला कडाडून विरोध केला.

सरकारी दबावापुढे झुकून पोलीस विभाग हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक करत आहे, तर खून आणि दरोडा असे असंख्य गुन्हे करणाऱ्यांना मोकाट सोडले जात आहे. हे निंदनीय आहे. हिंदू कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचा गुन्हा दाखल केला जात आहे. पोलीस स्वतः म्हणत आहेत की ते कायदेशीर कारवाई करत आहेत. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे नेते कृष्णा भट म्हणाले की, आम्हीही कायदेशीर संघर्षाद्वारे याला उत्तर देऊ.

 

या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यां सहभागी झाल्या होत्या.

Tags: