बेळगावच्या अनगोळ येथील जनता कल्याण ट्रस्ट संचालित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेतील किंडरगार्टनच्या विद्यार्थ्यांचा २०२४-२५ सत्राचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ललिता धगे यांनी हजेरी लावली, तर अध्यक्षस्थानी परमेश्वर हेगडे होते. किंडरगार्टन विद्यार्थ्यांना विशेष पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभात विद्यार्थ्यांनी पदवी हॅट आणि कोट घालून आनंद साजरा केला.

प्रमुख अतिथी ललिता धगे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार मिळावेत, जेणेकरून ते आदर्श नागरिक बनावेत, असे मार्गदर्शन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी शाळेबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या शाळेत इंग्रजी माध्यमाबरोबरच भारतीय संस्कृतीचे मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले जातात.

या कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापन सदस्य, प्रशासकीय अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments