बेळगाव येथील माहेश्वरी अंधशाळेत नवनिर्वाचित महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेवक गिरीश धोंगडी आणि अभिराम कामत यांनाही सन्मानित करण्यात आले.
बेळगाव शहरातील माहेश्वरी अंधशाळेच्या वतीने नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलघटगी होते. या वेळी महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात संस्थेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, शाळेच्या प्रगतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव चिंतामणी ग्रामोपाध्याय, पदाधिकारी आनंद जोशी, गणेश हेगडे, कीर्ती राजपूत, राजशेखर हिरेमठ, श्रीनिवास शिवणगी, चंद्रशेखर बेंबळगी, ओमप्रकाश भंडारी, शिक्षक, पालक आणि शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शिल्पा कुसुळपूर यांनी केले, तर आभार अनिता गौड यांनी मानले.


Recent Comments