बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे भरधाव इनोव्हा कार विद्युत खांबावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट झाले असून, सीसीटीव्हीत हा धक्कादायक अपघात कैद झाला आहे.
गोकाक शहरातील बसव मंटपाजवळ हा अपघात घडला. भरधाव असलेल्या इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती थेट विद्युत खांबावर जाऊन आदळली. या धडकेमुळे खांब कोसळून कारवर पडला आणि वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाले. यामुळे विद्यापूर परिसरातील काही घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताची नोंद गोकाक शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments