बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदोळी गावात बांधण्यात आलेल्या श्री करीसिद्धेश्वर आणि जडीसिद्धेश्वर मंदिरांचा वास्तुशांती आणि कळसारोहन सोहळा भक्तीपूर्ण वातावरण पार पडला. राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा मंगलमय विधी संपन्न झाला.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी बोलताना, ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक केले आणि सातत्याने गावच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. आपण आमदार असताना आणि मंत्री झाल्यानंतर गावात अनेक विकासकामे राबविली. हा विकास सतत सुरू राहील, असे सांगून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यापुढेही सर्वांचे सहकार्य मागितले.

यावेळी सुरेश पाटील, राकेशगौडा पाटील, शिवू सैबन्नवर, शीला तीप्पन्नगोळ, राजू पाटील, कृष्णा अनगोळकर, सुरेश मुचंडी, लक्ष्मण हलगेकर, ब्रह्मा शहापूरकर, यल्लप्पा शहापूरकर, लक्ष्मण अगसीमणी, नागेश देसाई, मल्लार मुचंडी, मल्लप्पा शहापूरकर, मल्लप्पा तिप्पन्नगोळ, नागेंद्र कुरुबर, लक्ष्मण पूजारी, युवराज कदम, यल्लप्पा शहापूरकर, रामानिंग अनगोळकर, नागेंद्र बेंडीगेरी, निंगप्पा शहापूरकर आणि श्री करिसिद्धेश्वर आणि जडीसिद्धेश्वर मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments