Belagavi

महांतेश नगर येथे टिप्परच्या धडकेत पादचारी ठार

Share

बेळगाव महांतेशनगर येथे भरधाव टिप्परने पादचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली असून, यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

बेळगावमधील महांतेशनगरमधील पुलाजवळ गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. पादचारी रस्त्याच्या बाजूने जात असता मागून आलेल्या टिप्परने त्याला चिरडले. या अपघातात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. हा अपघात बेळगाव उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

Tags: