Belagavi

एस.जी.बी.टी.आय मध्ये संमिक्षणा 2025 टेक फेस्ट संपन्न

Share

बेळगावच्या एस.जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात संमिक्षणा – 2025 या राष्ट्रीय टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. जर स्वप्न मोठे असतील आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते, असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून, शांतता आणि सौहार्द जपण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमाला डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी देखील उपस्थित होते. तसेच, एस.बी.आय.टी.चे चेअरमन एफ.व्ही. मानवी, एम.डी. वेंकटेश्वर, प्राचार्य बी.आर. पटगुंदी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी नसतात, तर जी स्वप्ने झोप उडवतात, तीच खरी असतात, असे म्हणत त्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकारण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.

या टेक फेस्टमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

Tags: